Sunday, 15 September 2019

“ग्रामसेवकांच्या मागण्या मंजूर झाल्याने आंदोलन स्थगित”

२३ दिवसाच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा गावगाडा पूर्ववत सुरू.”
गोंदिया,दि.15:- ग्रामसेवकांच्या जवळपास मागण्या मंजूर झाल्याने दि.१४ सप्टेंबर रोजी हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे ग्रामसेवक संघटना डीएनइ १३६ ने स्पष्ट केले आहे.दि.१४ रोजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्यासोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे रद्द करून पंचायत विकास अधिकारी या एकाच पदाला मान्यता देण्यासोबतच ग्रामसेवक प्रवर्गास १५०० रुपये प्रवासभत्ता आदींबाबत लवकरच आदेश काढण्याच्या सूचना मंत्रीमहोदयानी संबंधित विभागांना दिल्या.ग्रामसेवक शैक्षणिक अहर्ता पदवीधर करून त्वरित आदेश काढण्यासोबतच ४ जानेवारी २०१७ च्या अनियमीतेबाबत फौजदारी गुन्हा दाखल करणेबाबतची फाइल त्वरित निकाली काढण्यात यावी.असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.अतिरिक्त असलेले कामे कमी करण्यासाठी सविस्तर चर्चा होऊन गठीत समितीच्या शिफारशीनुसार योग्य कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.ग्रामसेवकांच्या आंदोलनादरम्यान वेळोवेळी ना चंद्रशेखर बावनकुळे व गिरीश महाजन यांच्या माध्यमातून फोनद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा घडवून आल्याने ग्रामसेवक संघटनेला त्याचा मोठा फायदा झाल्याचे यावेळी संघटनेकडून सांगण्यात आले.
या बैठकीला संघटनेचे राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे,सरचिटणीस प्रशांत जामोदे,कोषाध्यक्ष संजीव निकम,कार्याध्यक्ष गळगुंडे तात्या , मानद अध्यक्ष अनिल कुंभार , उपाध्यक्ष सुचित घरत , संयुक्त सचिव सचिन वाटकर , प्रसिद्धी प्रमुख बापु अहीरे , संपर्क प्रमुख उदय शेळके विभागीय सचिव कमलेश बिसेन , विभागीय अध्यक्ष amol घोळवे नारायण बडे , शिवराम मोरे सहसचिव कोकण भालके मॅडम , नागपूर जिल्हाध्यक्ष सुभाष धारपूरे, नांदेड अध्यक्ष एन.डी.कदम , परभणी अध्यक्ष भोसले , हरीभाऊ लोहे , दिपक दवंडे , रमेश मुळे , पूंडलीक पाटील, उबाळे अन्ना , पुणे अध्यक्ष वाव्हलजी सचिव संदीप thaval जिवन कोल्हे , सुधाकर बुलकुंदे , अशोक काळे बुलढाणा तुकाराम सदावर्ते विष्णू इंगळे गोविंद गीते बीड शिवाजी जाधव , भाऊसाहेब मिसाळ शहाजी नरसाळे बागायतकर सरचिटणीस सिंधुदुर्ग शेळके आना शेख व सर्व राज्य,विभागीय व जिल्हास्तरीय पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
राज्यातील जवळपास २२ हजार ग्रामसेवकांनी दि.२२ ऑगस्टपासून हे कामबंद आंदोलन सुरू केले असल्याने राज्यातील गावगाडाच ठप्प झाला होता.अखेर २३ दिवसाच्या प्रतिक्षेनंतर दि.१४सप्टेंबर रोजी प्रलंबित मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय झाल्याने आंदोलनात सहभागी असलेले सर्व ग्रामसेवक आता पंचायत समितीत असणाऱ्या चाव्या घेऊन आपल्या कामावर रुजू होणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...