आज भारताचे मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोरा यांनी निवडणुक कार्यक्रम जाहीर केला. त्याप्रमाणे, निवडणुकीची अधिसूचना ही 27 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. नामाकंन दाखल करण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर असून नामांकन पत्राची छाननी ही 5 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. नामांकन मागे घेण्याची तारीख 7 ऑक्टोबर असून प्रत्यक्ष मतदान 21 तारखेला होईल. तर मतमोजणी ही 24 ऑक्टोबरला करण्यात येणार असून निवडणुकीचा निकाल लगेच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणुक आयुक्त अरोरा यांनी दिली.
महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागा असून या जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणुक घेण्यात येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे उमेदवाराला या निवडणुकीत प्लॅस्टिकचा वापर करण्यावर बंदी लावण्यात आली आहे. दिवाळी च्या आधी या निवडणुकीचा निकाल येणार असल्याने कोणत्या पक्षाला फटाके फोडण्याची संधी राज्याचे मतदार देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे राज्यात या निवडणुकीला घेऊन आघाडीत जागा वाटपाचा तिडा जवळपास सुटल्यात जमा असून सत्ताधारी पक्षांच्या युतीचे गुपीत अद्याप तरी बाहेर आले नसल्याने संभ्रमाची स्थिती कायम आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा या समरामध्ये उडी घेणार असल्याचे संकेत आहेत. दुसरीकडे वंचित आघाडी आणि एमआयएम यांच्यात बेबनाव झाल्याचे याचा फायदा कोणत्या गटाला मिळेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. राज्यात आचारसंहिता लागू झाल्याने आता आघाडी आणि युतीच्या यात्रा आता गुंडाळाव्या लागणार आहेत.
No comments:
Post a Comment