Monday, 30 September 2019

नातेवाईकच निघाला वृद्ध महिलेचा खरा मारेकरी

अर्जुनी-मोर,दि.30 - गेल्या 10 सप्टेंबर रोजी तालुक्यातील वडेगाव रेल्वे येथे घडलेल्या लक्ष्मीबाई शिलेवर हत्या प्रकरणी मज महिलेच्या नातेवाईकालाच अर्जूनी मोर पोलिसांनी अटक केली आहे. सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनात करण्यात आली.
 तालुक्यातील वडेगाव रेल्वे येथील लक्ष्मीबाई हनुमैया शिलेवर वय 65 वर्ष या वृद्ध महिलेचा दिनांक 10 सप्टेंबरच्या   रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या दरम्यान गळा आवळून खून करून रोख रक्कम आणि सोन्याचांदीचे दागिने पळविल्याची घटना घडली होती. मृत वृद्ध महिला ही अवेध दारूचा व्यवसाय करीत असल्याची माहीती आहे. फिर्यादी प्रशांत रामलू शिलेवर याच्या तक्रारीवरून संशयित आरोपी म्हणून पामेश्वर किसन कापगचे याला 12 सप्टेंबर रोजी पोलिसांनी अटके केली होती. मात्र, आरोपी कडून तपासात माहिती न मिळाल्याने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
या प्रकरणातील मुख्य आरोपी रमेश निरसया उत्तमवार वय 32 वर्ष राहणार सावरटोला हल्ली मुक्काम मानेगाव सडक याने खून करून गुन्हा केल्याचे समजताच ठाणेदार महादेव तोदले याचे नेतृत्वातील पथकाने मानेगाव सडकला आरोपी राहत असलेल्या भाड्याच्या घरात चौकशी केली असता सदर आरोपी हा करमभाड तहसील पारशिवनी जिल्हा नागपूर ग्रामीण येथे असल्याचा माहिती मिळाली. आरोपीचा सासरा सुरेश पल्लेवार यांचे घराची झडती घेऊन सदर आरोपीस 26 सप्टेंबरच्या रात्री दीड वाजता ताब्यात घेतले. आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने सदर खूनाची कबुली दिली. कर्जाचे पैसे देण्यासाठी लक्ष्मीबाईचा गळा दाबून खून केल्याचे त्यांनी  सांगितले. आरोपीने चोरून नेलेला ऐवज मानेगाव जवळील पोहरा गावाजवळ नाल्याच्या पुलाखाली लपवून ठेवल्याने ते जप्त करण्यात आले. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...