पुणे, दि.30 - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पुण्यातून निवडणुक लढविण्याची तयारी चालली आहे. कोथरूड मतदारसंघातून ते निवडणुक लढविण्यास उत्सुक असून त्या मतदार संघात मेघा कुलकर्णी या आमदार आहेत. त्यामुळे पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्याची कुणकुण लागताच ब्राम्हण महासंघाने पाटील यांना तीव्र विरोध केला आहे. प्रसंगी श्री पाटील यांचे विरोधात ब्राम्हण महासंघाने बंडखोर उमेदवार उभा करण्याची तयारी चालविली आहे.
या मतदारसंघात ब्राम्हण मतदारांची संख्या मोठी आहे. कोल्हापूरच्या मंदीरातून ब्राम्हण समाजाला हाकलणाऱ्या, दादाजी कोंडदेव आणि गडकरी यांच्या पुतळ्याला न्याय न देणाऱ्य़ा पुण्याबाहेरील ब्राम्हणद्वेष्टी व्यक्तीला पुण्यातून उभी राहत असेल तर ब्राम्हण समाज त्याचा विरोध करील, अशी भूमिका महासंघाने घेतली आहे. जातीय आरक्षणाचे समर्थन करून खुल्या प्रवर्गातील लोकांना संधी नाकारणाऱ्या पक्षाबरोबर जायचे की नाही याचा विचार करावाच लागेल, असे महासंघाचे म्हणणे आहे. प्रसंगी ब्राम्हण समाजाचे उमेदवार निवडणुकीत उतरविण्याची तयारी केली जात असल्याचे सुद्धा सांगण्यात येते.
No comments:
Post a Comment