देवरी: २९
बृहन महाराष्ट्र योग परिषद अमरावती अंतर्गत व गोंदिया जिल्हा योग असोसिएशन अंतर्गत जिल्हा स्तरीय योगासन स्पर्धा सिंधी शिक्षण संस्था गोंदिया येथे आज 29 ला पार पडली असून स्पर्धेमध्ये देवरी येथील स्पर्धकांनी उत्कृष्ट प्रदर्शन करित बाजी मारली. सदर स्पर्धेमधे वयोगट 8-13 मुले मधे कुणाल चुटे प्रथम , हर्षित चुटे 13-18 द्वितीय,
रोहित ब्रामहनकर 18-25 त्रुतीय,
रोशनी कळमकर 25-35 द्वितीय ,
पुरुष वयोगटात 35-50 प्रमोद कळमकर प्रथम या प्रकारे स्पर्धकांनी सहभाग दर्शविला होता.
सदर स्पर्धकांना योग शिक्षक प्रमोद कलमकर आणि रोशनी कलमकर यांचे मार्गदर्शन लाभले होते.
योग समिति देवरीच्यावतिने विजेता स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले.
No comments:
Post a Comment