Thursday, 26 September 2019

ककोडीच्या स्वस्तधान्य दुकानदारानी केली मारहाण

सुभाष सोनवाने
चिचगड,दि.26:-तालुक्यातील रेशन दुकानदारांच्या बाबतीत महसुल प्रशासनाकडे अनेक तक्रारी असतानाही त्या तक्रारींची दखल घ्यायला प्रशासन व लोकप्रतिनिधी तयार दिसून येत नाही.त्यातच आपल काही होत नसल्याचे बघून रेशन दुकानदारांनीही मनमानी कामकाज सुरु केल्याचा प्रकार बघावयास मिळत आहे.
त्याचे असे की, ककोडी येथील स्वस्त धान्य दुकानदाराने एका महिलेला रेशन धान्याची पावती ज्या दिवशी दिली त्यादिवशी त्या महिलेला धान्य न दिल्याने सदर महिला दुसर्या दिवशी धान्यकरीता गेली असता दुकानदारांने दिलेल्या पावतीला पाणी लागल्याने त्यावरील आकडे स्पष्ट दिसत नसल्याने सदर लाभार्थी महिलेला थांबायला सांगितले. हा प्रकार त्याठिकाणी हजर असलेल्या बजरंग दलाचा सदस्य शैलेश ताम्रकर यांने ज्यादिवशी पावती दिली त्याच दिवशी धान्य का दिले नाही, अशी विचारणा केली. यावरुनस्वस्तधान्य दुकानदार व शैलेश ताम्रकर यांच्या वाद निर्माण होऊन तो मारहाणीपर्यंत गेला. नेहमीच आमच्या कामात अडथळ निर्माण करतो असे म्हणत स्वस्तधान्य दुकानदार व त्या दुकानातील एका इसमाने शैलेशला बेदम मारहाण केली. यात शैलेशच्या डोक्यावर मार लागल्याने रक्तबंबाळ झाले. या मारहाणीची माहिती लगेच चिचगड पोलिसांनी देण्यात आल्यानंतर चिचगडचे पोलिस निरिक्षकांनी शैलेशला चिचगडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करुन याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेतला. या मारहाण प्रकरणात चिचगड पोलिसांनी  भजनसींग भाटीया , बबलु भाटीया, बबलु भाटीया(मुलगा), ननकु भाटीया, सुरजीत सींग भाटीया यांच्यावर भारतीय दंड संहीता अधीनीय्यम १८६० अंतर्गत कलम- १४३,१४७,१४९,३२४,५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केले असून याप्रकरणात काहींनी अटक करण्यात आली आहे. दरम्यान, परिसरात बजरंग दलाच्या नावावर शैलेश ताम्रकर हा इतरांना त्रास देत असल्याची चर्चा समोर आली आहे

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...