Wednesday, 4 September 2019

३३ किलो गांजा पकडलाःस्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

गोंदिया,दि.०४ : पोलिस अधिकारी आणि कर्मचारी नियमीतपणे गोंदिया तालुक्यात गस्तीवर होते. दरम्यान त्यांना बघून एका बोलेरो चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात पळविले.पोलिसांना संशय आल्याने त्याचा पाठलाग करून पकडले असता बोलेरो वाहनातून तब्बल ३३.५०२ किलो ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी याप्रकरणी वाहनासह ५ लाख २८ हजार ७५१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी(ता.३) करण्यात आली. 

सविस्तर असे की, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी शासकीय वाहनाने मंगळवारी गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बटाणा, बरबसपुराकडे जात होते. दरम्यान गोंडीटोला जवळ पोलिस वाहनाकडे बघून सिल्व्हर रंगाच्या महिंद्रा बोलेरो( एमएच २९, एल. ०२६५) वाहन चालकाने वाहन वेगात चालवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. हे बघून पोलिस पथकाला वाहनचालकावर संशय आला. त्यांनी महिंद्रा बोलेरो वाहनाचा पाठलाग केला. ते वाहन अडवून वाहनाची तपासणी केली. वाहनाच्या मागील सिटवर हिरवी, पिवळी आणि पांढऱ्या रंगाच्या एकूण तीन प्लॅस्टीकच्या पोती आढळून आल्या. त्या पोत्यांबाबत चालक चैनलाल नेतलाल बोपचे( वय ३६, रा. नक्सी जि. बालाघाट म.प्र.) याला विचारणा केली असता तिन्ही पोत्यांमध्ये गांजा असल्याचे कबूल केले. पोलिसांनी तिन्ही पोत्यांमधून ३३ किलो ५०२ ग्रॅम वजनाचा गांज्याचे पंचासमक्ष पंचनामा करून जप्त केले. जप्त केलेल्या गांजाची किंमत २ लाख १७ हजार ७५९ रुपये आहे. त्यांच्याकडून मोबाईल, वाहन आणि गांजा असा एकूण ५ लाख २८ हजार ७५९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे, अपर पोलिस अधीक्षक अतुल कुळकर्णी, उपविभागीय पोलिस अधीकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर ठोसरे, सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप अतुलकर, रमेश गर्जे, पोलिस उपनिरीक्षक तेजेंद्र मेश्राम, कर्मचारी लिलेंद्र बैस, चंद्रकांत कर्पे, गोपाल कापगते, राजेश बढे, तुळसीदास लुटे,विजय रहांगडाले यांनी केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...