Monday, 30 September 2019

आमदार अग्रवालांच्या हातात भाजपचा झेंडा

मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत केला भाजप प्रवेश
नागपूर, दि.३० - गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते व गोंदिया विधानसभा मतदारसंघातील सलग तीनदा आमदार राहिलेले गोपालदास अग्रवाल यांनी आज सोमवारला (दि.३०) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
आ.अग्रवालांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम येथील रामदासपेठ स्थित होटल सेंटर पाँईट येथे पार पडला. यावेळी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार खोमेश रहांगडाले, उमादेवी अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. गोंदियातून ४०० ते ५०० कार्यकर्त्यांसह आमदार अग्रवाल दुपारी गोंदियावरून भाजप प्रवेशासाठी रवाना झाले होते. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सीमा मडावी, माजी महिला बालकल्याण सभापती विमल नागपुरे, नगर परिषदेचे बांधकाम सभापती शकील मंसुरी यांच्यासह अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी नागपूर येथे अग्रवालांच्या भाजप प्रवेशाच्यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...