Thursday, 5 September 2019

देवरीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सभा संपन्न

....
 देवरी-आमगाव विधानसभा निवडणुकीवर चर्चा

देवरी,दि.05- आगामी विधानसभा निवडणुकीची पूर्व तयारी संदर्भात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची आमगाव-देवरी विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांची सभा आज गुरूवारी (दि,.05) स्थानिक अग्रसेन भवनात आयोजित करण्यात आली होती.
या सभेच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन हे होते. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, माजी आमदार दिलीप बंसोड, ओबीसी सेलचे प्रभाकर दोनोडे,  रमेश ताराम, गोपाल तिवारी, राजलक्ष्मीताई तुरकर, जीयालालजी पंधंरे, अमरदास सोनबोईर, फगनु कल्लो, बबलु भाटीया,  देवरी तालुका अध्यक्ष छोटेलाल बिसेन, पारबता चांदेवार, योगेस देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. बिसेन म्हणाले की, आज निवडणुकीला स्पर्धेचे स्वरूप आले आहे. राजकीय नेते जनतेचा विचार करताना दिसत नाही, देवरी सारख्या अतिदुर्गम, नक्षलग्रस्त आणि आदिवासी  बहुल भागात सत्ताधारी नेत्यांनी विकासाच्या नुसत्या बोंबा ठोकण्यापलिकडे एकही विधायक कार्य करता आले नाही. साध्यासोप्या अडचणी देखील सत्ताधारी लोकप्रतिनिधी सोडवू शकले नाही. यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी खंबीरपणे जनतेची कामे करून पक्षाची ध्येय-धोरण ही शेवट्या घटकापर्यंत पोचविण्याचे कार्य प्रामाणिकपणे केले पाहिजे. 
यावेळी प्रकाश जनबंधू यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. यावेळी आमगाव-देवरी विधानसभेची तिकीट राष्ट्रवादीला मिळावी, असा आवाज कार्यकर्त्यांनी बुलंद करत उपस्थित नेत्यांना तिकीटाचा आग्रह केला. यासंदर्भात विजय शिवणकर यांनी पक्षाचे नेते शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या कानावर कार्यकर्त्यांचा आवाज पोचविण्याची ग्वाही देत या मतदार संघात राष्ट्रवादीचात उमेदवार असेल, अशी ग्वाही दिली.
या सभेला आमगाव-देवरी विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...