Friday 6 December 2019

लाखनीची नगराध्यक्ष पतीसह एसीबीच्या जाळ्यात

भंडारा,दि.06ऋ लाखनीची नगराध्यक्ष ज्योती निखाडे व तिचे पती राजू निखाडे या दोघांना गुरुवार, ५ डिसेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ९ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. दोघांविरोधात लाखनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तक्रारकर्त्या व्यक्तीने नगर पंचायतीअंतर्गत कंत्राटी पद्धतीने काम पूर्ण केले. पूर्ण केलेल्या कामांचे ४ लाख ६४ हजार ९२३ रुपये एवढे देयक निघाले. देयक काढण्यासाठी ३ टक्के रक्कम कमिशन म्हणून नगराध्यक्षाकडून मागण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ३ टक्के
रक्कम ही १३ हजार ५०० रुपये देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. ४ डिसेंबरला तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर गुरुवारी सापळा रचण्यात आला. तडजोडीअंती ९ हजार रुपये म्हणजे २ टक्के रक्कम देण्यास तक्रारकर्ती व्यक्ती तयार झाली. नगर पंचायत कार्यालयात लावलेल्या सापळ्यात लाचेची रक्कम घेताना गुरुवारी नगराध्यक्ष ज्योती निखाडे व तिचा पती राजू निखाडे रंगेहात पकडले गेले. या दोघांविरोधात लाखनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करुन गुन्हा नोंदविण्यात
आला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान नगराध्यक्ष निखाडेच्या घरीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून झडती घेण्यात आल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक महेश चाटे, पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी व सहकाèयांनी केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...