Saturday 7 December 2019

जांभूळखेडा भूसुरुंग स्फोटाच्या आरोपींवर दोषारोपपत्र दाखल

गडचिरोली,दि.06ः-जिल्ह्यातील कुरखेडा उपविभागीय पोलीस हद्दीतील जांभूळखेडा गावानजीक महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोट घडवून आणला होता. यामध्ये एक खाजगी वाहन चालकासहित गडचिरोली पोलीस दलाचे पंधरा पोलीस जवान शहीद झाले होते. सदर घटनेनंतर पुराडा पोस्टे येथे अप. क्र. १९/२०१९  गुन्हा दाखल करण्यात आला होता.यानंतर शासनाच्या आदेशान्वये गुन्ह्याचा तपास हा नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. गडचिरोली पोलीस दलाने अटक केलेल्या वरील नमूद व सर्व आरोपींवर एनआयएने आज दोषारोपपत्र दाखल केले आहे.
सदर गुन्ह्याचे अनुषंगाने गडचिरोली पोलीस दलाने वेगाने तपास करत जहाल नक्षलवादी उप्पुगंटी निर्मलाकुमारी उर्फ नर्मदाक्का व तिचा पती सत्यनारायण उर्फ किरण यांच्यासहित दिलीप श्रीराम हिडामी, परसराम मनीराम तुलावी, सोमसाय दलसाय मडावी, किरण सिताराम हिडामी, सकरू रामसाय गोटा, कैलास प्रेमचंद्र रामचंदानी अशा आठ मुख्य आरोपींना अटक करण्यात यश मिळवले होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...