देवरी,दि.15- स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गोंदियाच्या हिलींग हॅण्ड्स क्रिटीकल केअर रूग्णालयाच्या वतीने एक दिवसीय रोगनिदान शिबीराचे यशस्वी आयोजन आज रविवारी (दि.15) करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये परिसरातील दमा, हृदयरोग, संधीवात, लकवा रक्तशर्करा, थायराईड या रोगाच्या रुग्णाचे निदान आणि उपचार करण्यात आले. यावेळी रुग्णांना मोफत औषधींचे वाटप सुद्धा करण्यात आले. या शिबीराचे आयोजन देवरी येथील सामाजिक कार्यकर्ते युगेश छोटेलाल बिसेन यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. या शिबीरामध्ये डॉ. विनोद मोहबे यांनी रुग्णाची तपासणी केली. शिबिराच्या यशस्वितेसाठी सुनील पारधी, दिलीप दखने, मनोज बघेले, मुकूल बघेले आदींनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment