Friday 6 December 2019

डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काउंटर

हैदराबाद(वृत्तसंस्था)दि.06ः-पशुवैद्यकीय डॉक्टर बलात्कारप्रकरणातील चारही आरोपींचा एन्काउंटर करण्यात आला. पोलीस तपासावेळी आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर पोलिसांना गोळीबार करावा लागला. यात चौघांचा मृत्यू झाला. पीडितेवर अत्याचार झालेल्या घटनास्थळी चारही आरोपींचा एन्काउंटर करण्यात आला.
आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. यात हे सर्वजण ठार झाले असा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा एन्काउंटर झाला. मिळालेल्या माहितीनुसार कोर्टात आरोपपत्र दाखल केल्यानंतर चारही आरोपींना ‘सीन ऑफ क्राइम’ तपासण्यासाठी घटनास्थळी नेण्यात आले होते. मात्र त्यांच्यातील एका आरोपीने पोलिसाकडील शस्त्र घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले असते तर मोठा गदारोळ झाला असता. यामुळे पोलिसांकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता.
मात्र आता या घटनेनंतर पोलिसांच्या चौकशीचा मुद्दा समोर येणार का? मानवाधिकार कार्यकर्त्यांकडून संबंधित घटनेवर काय भाष्य होणार हे पाहणे गरजेचे आहे. परंतु संपूर्ण देशभरात या बलात्कार प्रकरणातील आरोपींबाबत संतापाची लाट होती. लोकांचा रोष, आक्रोश या आरोपींबद्दल होता. एखाद्या पीडितेसोबत बलात्कार करुन क्रूररित्या तिला जाळून टाकले जाते. त्यामुळे लोकांकडून पोलिसांच्या कृत्याचे सोशल मिडियावर कौतुक केले जात आहे. पीडित शादनगर येथील आपल्या घरातून शम्शाबाद स्थित कोल्लूर गावातील एका पशु चिकित्सालयात (वेटरनरी रुग्णालय) नोकरीसाठी निघाली होती. दरम्यान, पीडितीची स्कूटर शादनगर टोलनाक्याजवळ पंक्चर झाली होती. तिने तिची स्कूटर टोलनाक्याजवळ लावली आणि टॅक्सी करून ती पुढे ऑफिसला गेली. कामावरून परतत असताना पीडित स्कूटरजवळ आली तेव्हा बुधवारी सायंकाळी तिने बहिणीला कॉल करून स्कुटर रिपेअर करण्याबाबत माहिती दिली. बहिणीने टॅक्सी करून परत ये असं सांगितले,तेव्हा पीडितीने काही माणसं माझी मदत करायला तयार आहेत असे सांगितले. थोड्यावेळाने कॉल करते असे सांगून पीडितीने फोन ठेवला आणि त्यानंतर तिचा फोन बंद पडला. तिचे बहिणीशी रात्री ९. १५ वाजताच्यादरम्यान शेवटचे बोलणे झाले होते.दरम्यान, स्कूटरजवळ उभी असताना तिने तिच्या बहिणीला फोन केला होता. मी जिथे उभी आहे तिथे मला भीती वाटते आहे असं तिने बहिणीला सांगितलं होतं. या संभाषणानंतर तिचा फोन बंद झाला. शेवटी पीडितीच्या कुटुंबीयांनी शम्शाबाद पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळची ६ वाजता दुधवाल्याला जळालेला मृतदेह आढळून आला होता.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...