नागपुर:27 मनोहरभाई पटेल महाविद्यालयातील देवरी येथील प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सुधीर भांडारकर व शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालय अर्जनी मो. चे प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. गोपाल पालीवाल यांना नुकत्याच पार पडलेल्या विद्यान, तंत्राद्यान व ग्रामीण विकास या विषयावर आधारित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात उत्कृष्ट संशोधन पुरस्कार स्वरुपात शाल, श्रीफळ, सन्मानचीन्ह, प्रशस्तिपत्र व रोपटे देऊन वाइल्डलाइफ इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे वरिष्ठ वैद्यानिक डॉ बिलाल हबीब व श्री शिवाजी शिक्षण संस्थाचे विश्वस्त श्री दिलीप इंगोले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळेस विद्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महेंद्र ढोरे, चर्चासत्राचे संयोजक डॉ अतुल बोबडे
तसेच संस्थेचे अनेक विश्वस्त व अनेक विद्वान मंडळी उपस्थित होती. प्रा भांडारकर व प्रा पालीवाल या संशोघकद्वयानी गोंदिया जिल्हयातिल जैवविविधतेचा अनेक अभ्यास करुन तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्टित संशोधन पत्रिकेत प्रकाशित केला आहे. त्यांचे आतापर्यंत ५२ संशोधन प्रकाशित झाले आहेत. या आधी सुद्धा त्यांना अनेक सन्मान लाभले आहेत. त्यांनी या यशाचे श्रेय प्राचार्य डॉ अरुण झिंगरे व प्राचार्य डॉ दिलीप काकड़े तसेच यांना दिले आहे . त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment