चिचगड, दि.08- देवरी तालुक्यातील चिचगड येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या धान खरेदी केंद्राचे शनिवारी(दि.9) खरीप हंगाम 2019-20 साठी उद्घाटन करण्यात आले.
या खरेदी केंद्राचे उद्घाटने गोंदिया जिपचे उपाध्यक्ष अल्ताफ हमीद यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार रामरतन राउत हे होते. यावेळी भरत दुधनांग, माजी जिप अध्यक्ष प्रल्हाज भोयर,पोलिस पाटील जगदीश नरवरे, सरपंच कल्पना गोसावी, प्रा. जनार्धन कोल्हारे, श्री. रहांगडाले गुरुजी, अन्ना जैन, अल्ताफभाई, संस्थाध्यक्ष संतराम भोयर, उपाध्यक्ष भुवन नरवरे, राजेश बिंझलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
संचालन सचिव मारोती खंडारे यांनी केले. उपस्थितांचे आभार लिपिक सदाराम मडावी यांनी मानले. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment