- इयत्ता नववी प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा
वाशिम, दि. २१ : येथील जवाहर नवोदय विद्यालयात सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात इयत्ता ९ वी वर्गामध्ये रिक्त जागांकरिता प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन स्वरुपात स्वीकारण्यास सुरुवात झाली असून १० डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. सन २०१९-२० या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील मान्यता प्राप्त सरकारी, निमसरकारी अथवा खाजगी शाळेत इयत्ता ८ वी मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या निवड चाचणी परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.
ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णतः निशुल्क आहे. प्रवेश अर्ज नवोदय विद्यालय निवड समितीच्या www.navodaya.gov.in आणि https://www.nvsadmissionclassnine.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. निवड चाचणी प्रवेश परीक्षा ८ फेब्रुवारी २०२० रोजी वाशिम येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी वाशिम जवाहर नवोदय विद्यालय येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे प्राचार्य आर. एस. चंदनशिव यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment