देवरी,दि.9 - देवरीची ओळख शांत शहर म्हणून आहे. येथील सर्व नागरिक गुण्यागोविंदाने राहतात, ही एक गौरवास्पद बाब आहे. आपले नेहमी पोलिस दलाला सकारात्मक सहयोग मिळते, ही पोलिस दलासाठी सुद्धा जमेची बाजू आहे. आज सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल आला. समोर ईद सारखा सण आहे. यासाठी आपण सर्वांनी पुन्हा आपल्या एकतेचा परिचय देत धार्मिक सलोखा आणि शांतता राखण्यात सहकार्य कराल, असा मला पूर्ण विश्वास आहे, असे प्रतिपादन गोंदियाचे अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी देवरी येथे आज (दि.9) केले.
ते देवरी येथे पोलिस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकित मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले आणि ठाणेदार कमलेश बच्छाव प्रामुख्याने हजर होते. या बैठकीला नगराध्यक्ष कौशल्या कुंभरे, उपाध्यक्ष आफताब शेख, माजी नगराध्यक्ष सुमन बिसेन, पं.स. सदस्य अर्चना ताराम,महेंद्र मेश्राम, पारबता चांदेवार, राजेंद्र अग्रवाल, सुरेश भदाडे, गोपाल तिवारी, वाय के बोंबार्डे, रचना उजवणे, डिलेश्वरी बिंझाडे, सुनील चोपकर, महेंद्र वैद्य, सुरेश चन्ने आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीचे संचलन ठाणेदार कमलेश बच्छाव यांनी केले.
No comments:
Post a Comment