Monday, 4 November 2019

शेतकऱ्यांना सरसकट एकरी २५ हजाराची मदत द्या-जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गोंदिया,दि.04ः-जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही भागात सर्वेक्षण आणि पंचनामे करण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांच्या हाती आलेले धानपिक अवकाळी पावसामुळे निघून गेला. यामुळे शेतकरी बेहाल झालेला असून अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांचा पिकाचे पंचनामे झालेले नाहीत. शेतकरी संकटात सापडल्याने त्यांना सरसकट मदत देण्यात यावी, या मागणीचे निवेदन आज (दि.4) जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा मडावी,शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले,महिला बालकल्याण सभापती लता दोनोडे यांच्यासह  जिल्हा परिषद गिरीष पलीवाल,दीपकसिहं पवार,विजय लोणारे,ज्योती वालदे,सुरजलाल महारवडे तसेच अन्य जिल्हा परिषद पदाधिकारी उपस्थित होते.
परतीच्या पावसामुळे जिल्यातील धानपिकांचे ३५ ते ४० टक्के नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.यावर्षी १ लक्ष ९६ हजार हेक्टरवर खरिप हंगामात धानाची लागवड करण्यात आली होती.त्यामुळे कमी कालावधीत नुकसानभरपाईचे सर्वेक्षण करणे कमी मनुष्यबळाअभावी शक्य नाही.त्याकरीता शासनाने शेतकऱ्यांना एकरी २५ हजार सरसकट नुकसानभरपाई जाहीर करावी अशी मागणी, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदनातून करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...