देवरी,दि.03 - 66 आमगाव विधान सभा मतदार संघातील नवनिर्वाचित आमदार सहसराम कोरोटे यांचा देवरी तालुका कलार समाज बांधवांनी आज रविवारी (दि.03) रोजी शाल आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
यावेळी कलार समाज संघटनेचे अध्यक्ष डॉ. अनिल चौरागडे, सचिव रतिराम दरवडे, कोशाध्यक्ष किसन तिराले, कार्याध्यक्ष दयाराम बनसोड, बेरारटाईम्सचे संपादक सुरेश भदाडे, युवाध्यक्ष घनशाम फरकुंडे, दिलीप दखने, हेमराज रामटेककर, ज्योती रामटेककर, नितीन मेश्राम, लक्ष्मण दखने, विजय बावनथडे, परसराम मेश्राम, कमल मानकर, आदित्य शहारे, लोकराम सोनवाने आदी समाज बांधव प्रामुख्याने हजर होते. सत्काराला उत्तर देताना आमदार कोरोटे यांनी कलार समाजाने निवडणुकीत दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानत सामाजिक कार्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन उपस्थित समाज बांधवांना दिले.
No comments:
Post a Comment