Tuesday, 5 November 2019

गॅसजोळणी सुरक्षा तपासणीच्या नावावर कंपनी करतेय ग्राहकांची लुबाडणूक-दिपकसिंह पवार




देवरी,दि.०५ः-अधिकृत गॅस वितरण कंपनीकडून पुरविण्यात येणारी गॅसची सुरक्षा नळीची गॅरंटी पाच वर्षांची असते. पण ती सुरक्षा नळी दोन वर्षाच्या आत खराब होत आहे. दुय्यम दर्जाच्या सुरक्षा नळीचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येऊ लागलेल्या आहेत. त्यातच गेल्या गॅस वितरण कंपनीकडून दर दोन वर्षांनी ग्राहकांच्या घरातील गॅस जोळणीची तपासणी(रेगुलर ग्राहक)करणे अनिवार्य असतांनाही कंपनीकडून तसे पाऊल आजपर्यंत उचलले गेले नव्हते. मात्र गेल्या तीन चार दिवसापासून देवरी तालुक्यात गॅस कंपनीकडून तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. या तपासणी मोहीमेच्या वेळी ग्राहकाकंडून तपासणीच्या नावावर पैशाची मागणी होत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे सदस्य दिपकसिंह पवार यांनी केला आहे. सोबतच उज्वला गॅस योजनेसह सध्या नव्याने सुरु झालेल्या काही योजनेतील ग्राहकांच्या सुरक्षानळीची व सिलिंडर कॉकची तपासणी ही ५ वर्षात करावयाची असते. परंतु सध्या त्यांच्याकडेही जाऊन तपासणीच्या नावावर पैशाची मागणी होत असल्याने गॅस कंपनीने याकडे लक्ष द्यावे असे पवार यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...