Saturday 2 November 2019

लाच घेतांना पाथरीच्या सरपंच पतीला अटक




गोरेगाव,दि.01ः- तालुक्यातील आदर्श ग्राम असलेल्या पाथरी येथील सरपंच ममता जनबंधू यांचे पती मानेश्वर दासराम जनबंधू यांना 800 रुपयाची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज(दि.01)रंगेहाथ पकडले.
तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत सिंचन विहीर मंजुर झालेली होती.त्या सिंचन विहीरीच्या बांधकामाकरीता स्वतःखर्च केलेला होता.त्या खर्चाचे 22 हजार 17 रुपयाचा धनादेश काढण्याकरीता तो ग्रामपंचायतीकडे गेलेला होता.दरम्यान ग्रामसेवक राणे यांनी धनादेश तयार असून सरपंच याची स्वाक्षरी होण्यास आहे,आपण घरटॅक्सचा भरणा करुन घ्या.धनादेशावर स्वाक्षरीकरीता सरपंच यांचे पती मानेश्वर जनबंधू यांच्याकडे धनादेश दिल्याची माहिती दिली.त्यानंतर सरपंच यांचे पतीने धनादेशावर स्वाक्षरी घेतली आहे,त्या मोबदल्यात 1 हजार रुपयाची मागणी केली.ती रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांने लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली.त्या तक्रारीच्या आधारे सापळा रचून सरंपच ममता जनबंधू यांचे पती मानेश्वर जनंबधू याना तडजो़डीनंतर 800 रुपयाची लाच घेतांना आज रंगेहाथ पकडण्यात आले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...