Tuesday, 5 November 2019

पदवीधर मतदार संघ मतदार यादीत नोंदणी करा – जिल्हाधिकारी

भंडारादि. 5 :- 1 नोव्हेंबर 2019 या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर मतदार संघाची मतदार यादया नव्याने तयार करणेबाबत नमुना 18 मधील अर्ज स्विकारणे इत्यादी कार्यवाहीस 1 ऑक्टोबर पासून सुरुवात झालेली असून 6 नोव्हेंबर पर्यंत अर्ज स्विकारण्यात येणार असून पात्र पदवीधर मतदारांना त्याची मतदार यादी अंतर्गत नोंदणी व्हावी यासाठी प्रोत्साहित करण्याबाबत तसेच जास्तीत जास्त संख्येने मतदार नोंदणी व्हावी याबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली आहे.
परंतु भंडारा जिल्हयातील मतदार संघात अत्यल्प मतदार नोंदणी झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी 1 नोव्हेंबर 2019 या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर मतदार संघाची मतदार यादया नव्याने तयार करण्यासंबंधाने नमुना 18 मधील अर्ज 6 नोव्हेंबर 2019 पर्यत तालुका स्तरावर तहसिल कार्यालय येथे पदनिर्देशित अधिकारी यांचेकडे स्विकारण्यात येणार आहे. अर्जदार हा पदवीधर किंवा 3 वर्षे अभ्यासक्रमाची पदविका धारक असावा. अर्जासोबत पदवी वा पदविका प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका, आधारकार्ड किंवा वोटर कार्ड, एक फोटो आणि विवाहित महिला अर्जदारासाठी विवाहनोंदणी प्रमाणपत्र वा स्वतःचा पतीच्या नावाचा उल्लेख असलेला पॅनकार्ड वा दोन्ही नसल्यास लग्नाची पत्रिका आदींच्या स्वसाक्षांकित प्रती पुरावा म्हणून सादर कराव्यात. सदर अर्ज स्विकारण्याचा अंतीम दिनांक 6 नोव्हेंबर असून जास्तीत जास्त सर्व पात्र नागरिकांनी पदवीधर  मतदार नोंदणीत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीप चंद्रन यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...