मुंबई,दि.08(विशेष प्रतिनिधी)- देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर, पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. माझ्यासमोर कधीच 50-50 सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केल. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही पत्रकार परिषद बोलावली. यात त्यांनी भाजपची पोलखोल केली. अमित शहांच्या उपस्थितीत 50-50 चार फॉर्म्युल ठरला असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राच्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहिली आणि काळजी वाटली. शिवसेना आमच्यासोबत होते पण वाटले नाही. याचे उत्तर त्यांनीच शोधले तर बरे होईल, असा सल्ला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. तसेच महाराष्ट्राच्या विकासाच्या आड आम्ही कधीही राजकारण केले नाही. शब्द दिला म्हणजे दिला. आम्ही नसतो तर त्यांनी अचाट कामे केली असती का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पहिल्यांदाच शिवसेना प्रमुख्यांच्या कुटुंबावर खोटारडेपणाचा आरोप. जनता पुरेपूर ओळखून आहे खरे कोण बोलतो आणि खोटे कोण? आमच्यात काय ठरले होते. मी दिल्लीला गेलो नव्हतो. अमित शहा आले होते. फोनवर चर्चेवेळी त्यांनी सांगितले की, तुम्हाला लोकसभेला युतीच्या बदल्यात उपमुख्यमंत्रीपद मिळेल. मी त्यांना सांगितले की त्यासाठी मी लाचार नाही. मी माझ्या वडिलांना वचन दिले आहे. यावर त्यांनी म्हटले की ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री. तेव्हाही मी नाही म्हणालो. कारण मारामाऱ्या होतात, वाद होतात. यानंतर शहा मातोश्रीवर आले, माझ्या काळात हे नाते बिघडले माझ्याच काळात दुरुस्त करायचे आहे असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री वाटप मान्य केले. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही मान डोलवली. यावर फडणवीस यांनी आता जर मी मुख्यमंत्री पदाचे वाटप झाल्याचे निवडणुकीआधी बोललो तर पक्षात अडचणीत येईन. माझा शब्द आहे, असे सांगितले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी काय बोलले ते तुमच्यासमोर आहे. 2014 मध्ये शिवसेनेने त्यांचा अश्वमेधाचा घोडा अडविला होता. आणि आताही त्यांनी गोड बोलून शिवसेना संपविण्याचे काम सुरू केले होते. तरीही शिवसेनेने त्यांचा घोडा अडविला आहे. मी चर्चा थांबविली. अनौपचारिक दृष्ट्या त्यांनी ठरलेच नव्हते, असे बोलले, तुमचा अधिकार आहे.
पण मी शिवसैनिकांसमोर खोटा म्हमून जाऊ शकत नव्हतो. यामुळे त्यांचे वक्तव्य त्रासदायक होते. त्यामुळे त्यादिवशीची भाजपसोबतची चर्चा थांबविली. 50-50 टक्के मी मानलो असतो. पहिली अडीच की नंतरची यावरही मी मानले असते. लोकसभेनंतर अवजड उद्योग खाते दिले. शहा यांनी त्यावेळी सांगितले की चार दिवसांत मी काहीतरी करतो, पण त्यांनी केले नाही, यामुळे खोटे कोण बोलतो हे पहा असेही ठाकरे यांनी सांगितले. गेल्या 5 वर्षांत अच्छे दिनसाठी खोटे कोण कोण बोलले, नोटाबंदीवेळी खोटे कोण कोण बोलले हे जनतेला माहिती आहे. चंद्रकांत पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे मी अडचण समजून घेतली हा माझा गुन्हा झाला का? आम्ही मोदींवर कुठे टीका केली आहे. साताऱ्यात उदयनराजेंना घेतले ते किती काय काय बोललेत? दुष्यंत चौटाला यांनी काय टीका केली ते पहा. मोदींवरच नाही ते गुजराती लोकांवरही बोललेत, असे सांगत त्यांनी भाजपाच्या दुटप्पीपणावरही टीका केली.
No comments:
Post a Comment