देवरी,दि.03 - मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद-ए-मिलाद या सणानिमित्त शहरात शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरण कायम ठेवण्याच्या उद्देशाने देवरी पोलिस ठाणे येथे शांंतता समितींच्या पदाधिकाऱ्यांची सभा आज रविवारी (दि.03) दुपारी 4 वाजेच्या सुमारास आयोजित करण्यात आली होती.
या सभेला पोलिस विभागाच्या वतीने पोलिस उपनिरीक्षक अशोक अवचरे आणि फौजदार उमेश उके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी देवरीच्या नगराध्यक्ष कौशल कुंभरे, उपाध्यक्ष आफताब शेख, अर्चना ताराम, गोपाल तिवारी, सुरेश भदाडे, पारबता चांदेवार, महेंद्र मेश्राम, राजेंद्र अग्रवाल, पिंकी कटकवार, यादवराव पंचमवार, डिलेश्वरी बिंझाडे यांचे सह पदाधिकारी आणि पोलिस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शहरात शांतता आणि सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन देवरी पोलिसांच्या वतीने करण्यात आले.
No comments:
Post a Comment