Saturday, 2 November 2019

ग्राझिया टुलिओ कंपनीत अनेक अनियमितता- आ. सहसराम कोरोटे


 नवनिर्वाचित आमदारांच्या भेटीनंतर चौकशीला वेग


देवरीदि. 02 -  गेल्या 31 ऑक्टोबर रोजी देवरी औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या ग्राझिया टुलीओ लाईफस्टाईल प्रायव्हे़ट लिमिटेड कंपनीत  झालेल्या अपघातात 7 कामगार गंभीररीत्या भाजल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या प्रकरणी कंपनीला भेट दिली असता येथे अनेक त्रुट्या दिसून आल्या असून कामगारांच्या सुरक्षितविषयक कोणत्याही उपाययोजना येथे उपलब्ध नसल्याचे पाहणीत दिसून आले आहे. कामगारांना अल्पवेतनावर राबवून घेतले जात आहे. कंपनीचे व्यवस्थापक कोणतीही माहिती द्यायला तयार नाहीत. यावरून या कंपनीचे व्यवस्थापन किती मग्रुर आहे, हे दिसून येते. या कंपनी व्यवस्थापनाच्या पाठीमागे कोण आहे, याच्या खोलात जाऊन चौकशी केली जाईल. पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून दोषींना गजाआड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अपघातग्रस्त कामगारांना उत्तम उपचार आणि त्यांच्या कुटुंबीयांना पूर्ण वेतन देण्याची मागणी सुद्धा मी करीत आहे, अशा आशयाचे प्रतिपादन आमगाव विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार सहसहाम कोरोटे यांनी देवरी येथे केले. दरम्यान, पोलिसांच्या चालढकल तपासावर आमदार कोरोटे यांनी नाराजी व्यक्त करीत अद्याप गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, असा सवाल पोलिसांना विचारला.
ते स्थानिक औद्यागिक वसाहतीमध्ये असलेल्या ग्राझिया टुलीओ लाईफस्टाईल प्रायव्हे़ट लिमिटेड कंपनीमध्ये झालेल्या अपघाताची माहिती घेण्याकरीता आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांचेसह अड. प्रशांत संगीडवार, डॉ. अनिल चौरागडे, कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि स्थानिक माध्यम प्रतिनिधी हजर होते.
सदर कंपनीमध्ये काम करणारे 7 कामगार वितळलेले लोखंडाचे द्रव अंगावर पडल्याने गंभीररीत्या भाजल्याची घटना गेल्या 31 ऑक्टोबर रोजी दुपारी घडली होती. या प्रकरणी देवरी पोलिस चौकशी करीत असून अद्यापही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाही. जखमींवर नागपूरच्या खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापक राजपूत यांनी उपस्थितांना दिली. मात्र, कंपनीत एकूण किती कामगार कामावर आहेत, त्यांचे वेतन आणि कामगार सुरक्षे संबंधी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली नाही. या कामावर पुरुष कामगारांसह महिला कामगारही कामावर असल्याची कुजबूज कंपनी परिसरात होती. घटनेनंतर प्रत्यक्ष घटनास्थळावर असलेल्या महिला कामगारांनी या कंपनीमध्ये सुरक्षाविषयक साधने कामगारांना पुरविली जात नसल्याची तक्रार माध्यमांच्या प्रतिनिधींकडे केली होती, हे येथे विशेष. सदर कंपनी लागू असलेल्या कायद्याची सर्रास पायमल्ली करीत आमदार कोरोटे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...