नवी दिल्ली (वृत्तसंस्था),दि.09ः – सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी अयोध्येतील वादग्रस्त जमिनीचा निकाल सुनावला आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने सकाळी 10.30 वाजता एकमताने आपला निर्णय ऐकवला. सरन्यायाधीश रंजन गोगाई म्हणाले की, वादग्रस्त 2.77 एकर जमीन रामलल्लाला देण्यात यावी, मंदिराच्या निर्मितीसाठी 3 महिन्यांत ट्रस्ट स्थापन करावे असे कोर्टाने आदेश दिले आहेत. तर मुस्लिम पक्षाला मशीद उभारण्यासाठी 5 एकर पर्यायी जमीन देण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. पाडण्यात आलेल्या भाग रामाचे जन्मस्थान आहे आणि हिंदुचा हा विश्वास निर्विवादित असल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगाई म्हणाले.
खंडपीठाद्वारे 45 मिनीटे वाचण्यात आलेल्या 1045 पानांच्या निर्णयाने देशाच्या इतिहासातील सर्वांत महत्त्वाच्या आणि शंभर वर्ष जुना वाद मिटवला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगाई, न्यायमूर्ती एस.ए. बोबडे, न्या. डीवाय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण, न्या. एस अब्दुल नजीर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी मशीद बांधवी. तर रामलल्ला विराजमान यांना देण्यात आलेली वादग्रस्त जमीन केंद्र सरकारच्या मालकीची असेल.6 ऑगस्टपासून 16 ऑक्टोबरपर्यंत 40 दिवस हिंदू आणि मुस्लिम पक्षकाराची बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने हा निर्णय सुरक्षित राखून ठेवला होता.
5 न्यायाधीश खंडपीठचा निर्णय, निकालावर पाचही न्यायमुर्तींचे एकमत…
- सरन्यायाधीश रंजन गोगाई म्हणाले – मीर बकीने बाबरी मशीद उभारली होती. धर्मशास्त्रात प्रवेश करणे कोर्टासाठी योग्य ठरणार नाही. कोर्टाने धर्मशास्त्र क्षेत्रात हस्तक्षेप करणे अव्यवहार्य ठरेल. आम्ही एकमताने निर्णय देत आहोत. या कोर्टाने धर्म आणि भक्तांची आस्था स्वीकारली पाहिजे. कोर्टाने संतुलन राखले पाहिजे.
- भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) जमीनदोस्त केलेल्या संरचनेखाली मंदिर असल्याचे सांगितले होते.
- हिंदू या जागेला भगवान रामाची जन्मभूमी मानतात, इतकेच नाही तर मुस्लीम देखील या वादग्रस्त जागेबाबत हेच म्हणतात. प्राचीन यात्रेकरूद्वारे लिहिली गेलेली पुस्तके आणि प्राचीन ग्रंथ देखील अयोध्या रामाची जन्मभूमी असल्याचे दर्शवतात. यासह ऐतिहासिक उदाहरणे देखील असे दर्शवतात की अयोध्या ही हिंदूंच्या श्रद्धेने भगवान राम यांचे जन्मस्थान आहे.
- उद्ध्वस्त केलेली रचना ही भगवान रामांची जन्मभूमी आहे, हिंदूंचा हा विश्वास निःसंशय आहे. तथापि, धर्म, विश्वास यांच्या आधारे मालकी स्थापित केली जाऊ शकत नाही. हे विवादाचा निर्णय घेण्याची चिन्हे असू शकतात.
- ब्रिटिश काळाआधी हिंदू राम चबूतरा आणि सीता की रसोई येथे उपासना करीत असत असे आढळले आहे. रेकॉर्डमध्ये नोंदवल्या गेलेल्या पुराव्यांवरून असे दिसते की वादग्रस्त जागेचे बाह्य भाग हिंदूंच्या ताब्यात होते.
- सन 1946 च्या फैजाबाद कोर्टाच्या निकालाला आव्हान देणारी शिया वक्फ बोर्डाची याचिका फेटाळली. शिया वक्फ बोर्डाचा दावा हा वादग्रस्त रचनेवर होता. हाच दावा नाकारण्यात आला आहे.
- निर्मोही आखाड्याने जन्मस्थान व्यवस्थापित करण्याचा अधिकार मागितला होता. सुप्रीम कोर्टाने निर्मोही आखाड्याचा दावा देखील फेटाळून लावला.
सीता रासोई, राम पूतारे यांची उपस्थिती इथल्या धार्मिक वास्तव्याचा पुरावा आहे
सुप्रीम कोर्टाने सांगितले की, वादग्रस्त जमिनीखाली जे बांधकाम आहे, ते इस्लामिक बांधकाम नाही. मात्र ऑर्कोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (एएसआय) च्या अहवालातही मशीद बांधण्यासाठी मंदिर पाडले गेले आहे की नाही याबाबत सांगितले गेले नाही. परंतु, केवळ त्याचा अभिप्राय म्हणणे चुकीचे ठरेल. हिंदूंनी विवादास्पद भूमीला भगवान राम यांचे जन्मस्थान म्हटले आहे आणि मुस्लिमही या जागेबद्दल असेच सांगतात. उद्धवस्त करण्यात आलेल्या बांधकामाच्या ठिकाणी रामाचे जन्मस्थान असण्याचा हिंदूंचा विश्वास बिनविरोध आहे. याठिकाणी सीता रसोई, रामाचा चौथरा आणि भंडार गृह यांची उपस्थिती या ठिकाणच्या धार्मिक वास्तव्याचा पुरावा आहे. आस्था आणि विश्वासाच्या आधारे मालकी हक्क निश्चित केला जाऊ शकत नाही. हा केवळ वाद मिटवण्याचा पुरावा आहे.
No comments:
Post a Comment