गोंदिया,दि.23 : राज्यात पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा करत एकच जल्लोष केला. भाजप जिल्हा कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येवून मिठाई वाटून तोंड गोड केला व शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यालयासमोर व जयस्तंभ चौकात आतिशबाजी करून ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो ’ व ‘भारत माता की जय’चे नारे लावण्यात आले. तिरोडा येथे आमदार विजय रहागंडाले यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
यावेळी प्रामुख्याने माजी आमदार गोपालदास अग्रवाल, माजी आ. रमेश कुथे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नेतराम कटरे, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार बिसेन, दिपक कदम, दिनेश दादरीवाल, मनोहर आसवानी, शहर अध्यक्ष सुनिल केलनका, जिल्हा संपर्क प्रमुख संजय कुलकर्णी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जयंत शुक्ला, मिनू बडगुजर, अशोक हरिणखेडे, गणेश हेमणे, प्रदिपसिंह ठाकूर, शंभुशरणसिंह ठाकूर, रमेश दलदले, राजेश चतुर ,जीवन जगणित, नगरसेवक दिलीप गोपलानी, हेमलता पतेह, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री ऋषीकांत साहू, कुणाल बिसेन, नरेंद्र तुरकर, मुजीब पठान, चैतन्य सोनछात्रा, सतीश मेश्राम, अमित झा, संजय मुरकुटे, शहर महामंत्री बाबा बिसेन, मुकेश चन्ने, अशोक जयसिंघानी, राजा कदम, धर्मेंद्र डोहरे, चंद्रभान तरोणे, योगराज हरिणखेडे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष नेत्रदीप गावंडे, नितीश शाह, राजू शुक्ला, यासीन शेख, बाळकृष्ण मुनेश्वर, हरिराम आसवानी, विनोद चांदवानी, प्रशांत कोरे, बबली ठाकूर, मोंटू पुरोहित, देवचंद नागपुरे, कुलदिप रिनाईत, भावेश चौरसिया, ऋतुराज मिश्रा, संदीप श्रीवास, पलास लालवानी, राकेश लांजेवार, पारस पुरोहित, दिपक मालगुजार, दिपल अग्रवाल, विन्नी गुलाटी,अजिंक्य इंगळे, बंटी शर्मा, कमलजित सिंग, गणेश जाधव, श्रीकांत चांदुरकर, रितेश जायस्वाल, मंगलेश गिरी, प्रवीण पटले, देवेंद्र अग्रवाल, संकेश तिवारी, रामेश्वर लिल्हारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अर्जुनी-मोर तालुका भाजपा पक्ष कार्यालयात चार वाजता फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी तालुका भाजपा अध्यक्ष उमाकांत तोडेंगे कार्यकारी अध्यक्ष तथा पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर, जि प सदस्य रचना गहाणे, केवलराम पुस्तोडे, शिवनारायण पालीवाल, रघुनाथ लांजेवार, प्रकाश गव्हाणे, तुषार पवाडे, गिरीश बागडे, जि प सदस्य सौ मंदाताई कुमरे व इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी छोटेखानी सभेत मान्यवरांनी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला व पक्ष कार्यालयासमोर फटाके फोडून विजयोत्सव साजरा केला.
No comments:
Post a Comment