Sunday, 3 November 2019

ग्रापं सुरतोली सरपंचाच्या निष्काळजपणामुळे प्रवासी व विद्यार्थी तहानलेले




देवरी,दि.03 - शासनाच्या विविध योजनेद्वारे गाव तिथे पिण्याचे पाणी हि सुविधा सर्वांना हक्काने मिळाली पाहिजे, विविध योजने मार्फत या प्राथमिक सुखसोयी नागरिकांना मिळाले पाहिजे परंतु ग्रा पं सुरतोली येथील सरपंचाच्या अजब कारभारामुळे हि प्राथमिक पिण्याची पाण्याची सुविधा कित्तेक दिवसापासून बंद पडलेली आहे.
ग्रा पं सुरतोली अंतर्गत देवरी आमगाव रोड वर बस थांबा आहे. लोहारा हे केंद्र स्थानी असल्यामुळे शेकडो प्रवासी इथे ये जा करतात, या ठिकाणच्या दुकानदारांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे, महाविद्यालय आणि शाळेचे हजारो विद्यार्थी या ठिकानाहून ये जा करतात आणि या सर्वांना पिण्याच्या पाण्याचे साधन म्हणजे एक बोरवेल दशकापासून पाणी पुरवीत असते परंतु काही महिन्या पासून हि बोरवेल बंद पडलेली असून तिला दुरुस्त करण्यासाठी काही नागरिकांनी विचारणा केली असता येथील सरपंच भावना राऊत यांनी उडवाउडवी चे उत्तरे देऊन मी जाऊन बोरवेल दुरुस्त करू का असे लाजिरवाणे उत्तरे देऊन आपल्या कर्तव्याचेभान न ठेवता आणि गावातील आद्य नागरिकांची जबाबदारी न बघता टाळाटाळ केली.
विशेष म्हणजे या ठिकाणी दारूचे अवैध धंदे सुरु असल्यामुळे महिला प्रवासी आणि विद्याथ्यांना पाणी पिणे लाजिरवाणे वाटू लागल्यामुळे कमालीची समस्या निर्माण झालेली आहे.
यासंदर्भात योग्य कारवाई ची मागणी करण्यात येत आहे. पाण्याची समस्या सोडविली जाईल कि नाही असा प्रश्न अजूनही उभा आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...