देवरी,दि.03 -आदिवासींचे आराध्य दैवत क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण आज रविवारी (दि.3) तालुक्यातील मांगाटोला (कडीकसा) येथे करण्यात आले.
मांगाटोला येथे आयोजित एका कार्यक्रमात बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण देवरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश ताराम यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम हे होते. यावेळी राष्ट्र्वादी कॉंग्रेसचे देवरी तालुकाध्यक्ष छोटेलाल बिसेन, सरपंच कुंभरे, उपसरपंच सलामे, ककोडी येथील बबलू भाटिया, माजी जि.प.सदस्य मोतीराम सयाम, मोतीराम मडावी, सामाजिक कार्यकर्ते फगनो कल्लो, कचारगडचे गणेश उईके. आदिवासी प्रचारक हुडको आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री सलामे, राजकुमार पुराम,श्री हुडको आदी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
रमेश ताराम यांनी उपस्थित आदिवासी समाजबांधवांची दशा बदलविण्या करिता दिशा देण्याची गरज असून समाज बांधवांनी संस्कृतीची जोपासना केली पाहिजे आणि समाजातील सर्व युवकांनी चांगले शिक्षण घेऊन समाजात जनजागृती करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment