Wednesday, 6 November 2019

धान खरेदी केंद्र त्वरीत सुरू करा- आमदार सहसराम कोरोटे


 गोंदिया,ता.05 - जिल्ह्यात अवकाळी पावसाने धान पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. परिणामी, शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. याशिवाय जिल्हात अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नसल्याने शेतकरी दुहेरी संकाटात सापडला आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढून त्यांना धीर देण्यासाठी शासनाने जिल्ह्यातील सर्व धान खरेदी केंद्रे विनालंब सुरू करावे, अशी मागणी आमगाव विधानसभा क्षेत्राचे नवनियुक्त आमदार सहसराम कोरोटे यांनी काल मंगळवारी (दि.05) जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला दिलेल्या निवेदनातून केले आहे.
  निवेदन देतेवेळी शिष्टमंडळात गोंदिया जिल्हा कांग्रेसचे अध्यक्ष पुरूषोत्तम बाबा कटरे, राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते नरेश माहेश्वरी, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांच्यासह महाआघाडीच्या इतर पक्ष पदाधिकारी यांचा समावेश होता. समावेश होता. जिल्हाधिकारी कांदबरी बलकवडे यांचेशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाईचे पंचनामे त्वरीत करून तसा अहवाल शासनाकडे सादर करण्याचे सांगितले. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...