Monday 11 November 2019

ढासगडाच्या राखीव वनक्षेत्रावरिल अनधिकृत अतिक्रमण व बांधकाम त्वरित हटवा- भुपेंद्र मस्के


देवरीदि.11; गोंदिया वन विभाग अंर्तगत वनपरिक्षेत्र चिचगड येथिल वनक्षेत्र पिपरखारी-४ येथे ढासगड व जवळील संपुर्ण परिसर हा काही असामाजिक तत्वांनी अतिक्रमण करुन पक्के बांधकामही अंदाजे दहा वर्षापासुन केले आहे. त्यामुळे परिसरातील जैवविविधता नष्ट होत आहे. वन्यजिव तसेच वनस्पतीनांही मोठा धोका निर्मान झाला आहे.त्यामुळे अतिक्रमण व बांधकाम तात्काळ हटविण्याची मागणी वन परिक्षेत्र अधिकारी चिचगड यांचेकडे माहिती अधिकार कार्यकर्ते भुपेन्द्र मस्के यांनी केली आहे.
राज्याच्या वनजमिनीच्या संरक्षणासाठी शासन कटिबध्द असुन वनजमिनीवर अतिक्रमण करणारे गुन्हे एमपीडीए ( महाराष्ट्र प्रिव्हेंन्सन आँफ डेंजरस अँक्टिव्हीटी) या कायद्यार्तंगत आणण्याच्या प्रयत्नात आहे.राखीव वन क्षेत्रात अनधिकृत पणे प्रवेश करुन राहील्याने वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात कोणत्याही प्रकारची जीवीत अथवा वित्त हानी झाल्यास अशा प्रकरणात कोणत्याही प्रकारची भरपाई शासनाकडून देण्याची तरतुद नाही. वनक्षेत्रात अशा प्रकारे हानी झाल्यास संबंधित व्यक्ती विरुध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 च्या तरतुदींनुसार कारवाई करण्यात येते.वनजमिनीवरिल अतिक्रमन रोखण्यासाठी सँटेलाईट सर्व्हिलन्सचा उपयोग होत असतांनी या अतिक्रमनाकडे वनविभागाने कानाडोळा केला. अशा संबधित अधिकारी व कर्मचा-यांची विभागीय चौकशी करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी भुपेन्द्र मस्के यांनी केली आहे.
नैसर्गिक साधनसंपत्तीचे योग्य व्यवस्थापन ही काळाची गरज असुन राजकारण बाजुला ठेऊन वन्यजीव व वनस्पती वाचविता येईल. नैसर्गिक सौदर्यं टिकविण्यासाठी वन विकास महामंडळाकडे प्रस्ताव पाठवुन पर्यटन विकसित करता येईल. मात्र तेथे वेगवेगळ्या माध्यमातुन ध्वनीप्रदुषन व जलप्रदुषण केल्या जातो.
जर हे अतिक्रमन वैध असेल तर ढासगडाच्या परिसरात भक्तनिवासासाठी एक हेक्टर वनजमिनीची मागणी वनविभागाला केली आहे.व स्थानिक आमदाराला भक्तनिवासाकरिता पंधरा लक्ष रुपये निधीची मागणी इमेलद्वारे करुन वनविभागाला मस्के यांनी  पेचात टाकल्याचे दिसुन येते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...