Monday 11 November 2019

संजय राउत लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल

मुंबई,दि.11(वृत्तसंस्था) – शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राउत यांना लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना सोमवारी चेक-अपसाठी बोलावले होते. तत्पूर्वी त्यांना छातीत दुखण्याचा त्रास होता. परंतु, रुग्णालयात नेताना उद्भवलेल्या परिस्थितीमुळे राउत यांना दाखल करावे लागले आहे. 

याच ठिकाणी राहून त्यांच्यावर विविध प्रकारच्या चाचण्या घेऊन उपचार केले जात आहेत. त्यामुळे, राउत यांनी किमान दोन दिवस विश्राम करावा अशा सूचना डॉक्टरांकडून देण्यात आल्या आहेत. संजय राउत यांच्या अनुपस्थितीत सुभाष नार्वेकर, अनिल परब आणि अनिल देसाई यांच्यावर पक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, संजय राउत यांची स्ट्रेस टेस्ट घेण्यात आली होती. त्यानंतरच डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. यात त्यांची एन्जिओग्राफी होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागले. तेव्हापासूनच रोज तीन-चार वेळा संजय राउत माध्यमांशी संवाद साधत होते. त्यानंतरही भाजपवर मुख्यमंत्री पदासाठी दबाव टाकणे असो वा आपल्या पक्षाची भूमिका मांडणे, सर्वच घटनाक्रमात शिवसेनेकडून संजय राउत सर्वात पुढे होते. त्यातही राज्यपालांनी दिलेल्या निमंत्रणावर भाजपने सत्ता स्थापनेत असमर्थ असल्याचे सांगितले, शिवसेनेवर टीका केली. यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी 24 तासांची वेळ गेली, त्यावेळी सुद्धा संजय राउत यांनी प्रखरपणे आपली भूमिका मांडली. संजय राउत यांनी डॉक्टरांची आधीच अपॉइंटमेंट घेतली होती. अर्थात त्यांना आधीपासूनच छातीत दुखण्याचा त्रास होता असे कळते. परंतु, अगदी अपॉइंटमेंटच्या दिवशी (सोमवारी) सुद्धा त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. त्यातच राउत यांना आता रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...