गोंदिया,दि.21-गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या खमारी केंद्रातील हलबीटोला येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय चौथ्या शिक्षण परिषदेचे आयोजन काल मंगळवारी (दि.20) करण्यात आले होते.
या शिक्षण परिषदेचे उद्घाटन एन डी करंजेकर यांच्या अध्यक्षतेत अंजली ब्राम्हणकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिक यशोधरा सोनवाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक अंजली ब्राम्हणकर यांनी केले आर सी टेंभरे आणि मीनल बैस यांनी इंग्रजीसह गणित पेटीचा वापर व साहित्यासह प्रत्यक्ष अध्यापन याविषयी मार्गदर्शन केले. मूल्यवर्धन तासिकेत श्री चौधरी यांनी नवीन ऊर्जा देण्याचे कार्य केले. श्रीमती राहुलकर यांनी अपंग विद्यार्थी व त्यांची गुणदान पद्धत वर मार्गदर्शन केले. विपश्यना तासिकेत उके व खांडेकर या शिक्षकांनी वैयक्तिक व शालेय जीवनात कशाप्रकारे संधीचे सोने करता येईल व यावर सखोल मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment