Thursday, 21 November 2019

माजी आ.नागपुरे,रहागंडालेसह मदन पटले भाजप अध्यक्षपदाच्या स्पर्धेत

गोंदिया,दि.21 : भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणुकासंदर्भात आज २१ नोव्हेंबरला जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन गोरेगाव येथील  गुरूकृपा लॉन मध्ये दुपारी १२ वाजता करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बुथ अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष व जिल्हाध्यक्षांची निवडणुक व कार्यकारिणीचे गठन १५ डिसेंबरपर्यंत करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
त्यानंतर 1 डिसेंबरपर्यंत जिल्हाध्यक्षाची निवड करावयाची आहे.भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांचा कार्यकाळ संपत असल्याने नव्या अध्यक्षपदासाठी आत्तापासूनच चुरस निर्माण झाली आहे.माजी मंत्री राजकुमार बडोले यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष बनविण्यासंदर्भात हालचाली सुरु झालेल्या असतानाच त्यांनी आपण अध्यक्षपदापासून दूर राहणार असे संकते दिल्यानंतर आता या पदासाठी माजी आमदार भैरसिंह नागपुरे,माजी आमदार खोमेश रहागंडाले व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मदन पटले यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याचे बोलले जात आहे.पक्षातील युवकामध्ये नवा व युवा चेहरा अध्यक्ष असावा असा एक मत सुरु झाला असून मदन पटले यांच्या नावावर जिल्ह्यातील अनेक भागातून पसंती मिळत असल्याची चर्चा भाजपच्या गटात आहे.त्यामुळे दोन्ही माजी आमदारावर मदन पटले वरचढ ठरतात की हे दोन्ही आमदार पटलेवरं वरचढ ठरतात याकडे लक्ष लागले असले तरी जोपर्यंत संघटनमंत्री व पुर्व विदर्भ संघटनप्रमुख आपली मर्जी सर्वप्रकराची दाखविणार नाही,तोपर्यंत या तिघापैकी कुणालाही अध्यक्ष होता येणार नाही असेही बोलले जात आहे.
त्या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यशाळेत निवडणुक पर्यवेक्षक म्हणून विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष चैनसुख संचेती व प्रदेश प्रवक्ता आ. गिरीश व्यास उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रामुख्याने  खा. अशोक नेते, आ. विजय रहांगडाले, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आ. केशव मानकर, माजी आ. भजनदास वैद्य, माजी आ. भेरसिंह नागपुरे, माजी आ. संजय पुराम, माजी आ. रमेश कुथे, माजी आ. गोपालदास अग्रवाल व सर्व माजी खासदार, आमदार व प्रदेश कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहे.
दरम्यान संघटनात्मक निवडणुकीत भाग घेण्यासाठी सर्व अपेक्षितांना भारतीय जनता पार्टीचे सक्रीय सदस्य असणे बंधनकारक असल्याने कार्यशाळा सुरू होण्याआधीच सक्रिय सदस्यत्व फार्म शुल्कासह भरावे लागणार आहे. यावेळी छाननी प्रमुख म्हणून खा. अशोक नेते व सहप्रमुख म्हणून माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आ. भेरसिंह नागपुरे राहणार आहेत.
कार्यशाळेत प्रामुख्याने जिल्ह्यातील सर्व जिल्हा पदाधिकारी, निमंत्रित सदस्य, जिल्हा आघाडी व सेलचे अध्यक्ष, महामंत्री, सर्व मंडळ अध्यक्ष व महामंत्री, सर्व शक्ति केंद्रप्रमुख, सर्व जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती पदाधिकारी, सदस्य व लोकप्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, महामंत्री संघटन विरेंद्र अंजनकर, जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...