50 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक
गोंदिया,दि.06- कंत्राटी अभियंत्याचे मानधनाचे देयक काढणे आणि सेवा नियमित करण्याची शिफारस करण्याच्या मोबदल्यात 2 लाखापैकी 50 हजार रुपयांचा पहिला हप्ता लाच म्हणून स्विकारताना तिरोडा येथील गटविकास अधिकारी यांना त्यांच्या राहत्या घरातून लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज बुधवारी (दि.6) रंगेहाथ पकडले. सदर आरोपीवर गोंदियाच्या रामनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
त्या लाचखोर गटविकास अधिकाऱ्याचे नाव दिनेश ब्रिजलाल हरिणखेडे (वय 52) राहणार द्वारका नगर, जे. एम. पटेल हायस्कूलजवळ गोंदिया असे आहे.
प्रकरण असे की, तक्रारदार हे तिरोडा पंचायत समितीमध्ये बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून मानधनावर ग्रामीण गृह निर्माण अभियंता या पदावर 7 मार्च 2017 पासून कार्यरत होते. त्यांचा 30 ऑगस्ट 2019 ला सेवाकाल संपला होता. तक्रारदाराचे 1 एप्रिल ते 30 ऑगस्ट 2019 पर्यंत कामाचे अंदाजे 1 लाख रुपये पंचायत समितीकडे येणे होते. याशिवाय तक्रारदाराची सेवा पुढील 5 वर्षापर्यंत वाढविण्यासाठी बाह्ययंत्रणेकडे शिफारस करणे आवश्यक होते. या दोन्ही कामाचा मोबदला म्हणून आरोपीने तक्रारदाराकडे 2 लाख रुपये लाचेची मागणी केली.
मात्र, तक्रारदारास लाच देण्याचे नसल्याने त्याने 20 ऑक्टोबर रोजी गोंदियाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करून संबंधित विभागाने आज बुधवारी (दि.06) ला आरोपीच्या गोंदिया मुक्कामी राहत्या घरी सापळा लावला. यामध्ये आरोपीने लाचेचा पहिला हप्ता म्हणून 50 हजाराची रक्कम स्विकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. संबंधितावर स्थानिक रामनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली.
सदर कारवाई अधीक्षक रश्मी नांदेडकर आणिअप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांचे मार्गदर्शनात उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील, शिवशंकर तुंबडे, विजय खोब्रागडे, राजेश शेंद्रे, प्रदीप तुळसकर, रंजित बिसेन, डिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, वंदना बिसेन, गीता खोब्रागडे, देवानंद मारबते यांनी पार पाडली.

No comments:
Post a Comment