चिचगड,दि.11 - मुस्लीम बांधवांचा सण ईद मीलादुन्नबी काल रविवारी ( दि.10) रोजी चिचगड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
इद निमित्त शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीचे संपूर्ण नगर भ्रमण करून स्थानिक जामा मशिदीमध्ये समापण करण्यात आले. यावेळी मुस्लिम बांधवांनी शिरणी (प्रसाद) वाटून सर्वांना इदच्या शुभेच्छा दिल्या. या रॅलीमध्ये जामा मशिदीचे इमाम कयुम खान, समाजाचे अध्यक्ष शेख अब्दुल्ला, शेख इब्राहिम, शेख इरशाद, साबिर कुरेशी, नियाज अहमद, गुलामभाई, शेख हबीब टेलर आदी मान्यवरांचा सहभाग होता.
No comments:
Post a Comment