Wednesday, 27 November 2019

माझ्याकडून प्रत्येक काम सर्वोत्तम व्हावे - शिवानी दाणी

लाखनी: 27
धन्य धन्य झाशीची राणी गीताने दुमदुमली राणी शाळा

स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनी द्वारा संचालित राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय येथे तीन दिवशीय राणी लक्ष्मीबाई जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून सुप्रसिद्ध वक्ते आणि सिनेट सदस्य शिवानी दाणी,अध्यक्ष स्थानी आल्हाद भांडारकर, मधुकर लाड, भक्ती आमटे, मुख्याध्यापिका दिशा गद्रे, संमेलन प्रमुख बाबुराव निखाडे, गोवर्धन शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते.
राणी लक्ष्मीबाई जन्मोत्सवानिमित्य वीर गाथा सांगत माझ्याकडून प्रत्येक काम हे सर्वोत्तम व्हावे, या देशाला सुपर पवार बनविण्यासाठी मी योग्य भूमिका घेतली पाहिजे. आपली स्पर्धा ही स्वतः सोबत करावी. आपण एकमेव अद्वितीय आहोत. आपणच आपले शिल्पकार आहेत. यामुळे आपण नेहमी प्रयत्न करत राहावे. प्रामाणिक पण आपले कार्य केले तर यश आपल्याला मिळेल असे आपल्या प्रमुख मार्गदर्शनात शिवानी दाणी बोलत होते. यावेळी कला, विज्ञान व गाईड प्रदर्शनीचे उद्घाटन आणि अवलोकन केले. तसेच विद्यार्थिनी प्रतिनिधी लक्ष्मी अतकरी हिने विद्यालयाचा अहवाल सादर केला.
मातापालक संघातील कार्यक्रमात अध्यक्षस्थानी डॉ सोनाली भांडारकर यांनी किशोरावस्थेतील आव्हाहने पेलतांना या विषयावर किशोरावस्थेत घ्यावयची काळजी आणि आहारावर मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते बाल विकास प्रकल्प अधिकारी शीतल फाळके यांनी स्वतः चा आदर करून आपले भाव विश्व जोपासवे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच तिसऱ्या दिवशी कार्यक्रमाचा समापन सोहळा बक्षीस वितरणाने करण्यात आला. यावेळी समापन सोहळ्याला शिवलाल रहांगडाले, गट शिक्षणाधिकारी सुभाष बावनकुळे, सरपंच सुनीता भालेराव, नगराध्यक्ष ज्योती निखाडे, सावरी ग्राम पंचायत सरपंच संजीवनी नान्हे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक भाऊराव चेटूले, संचालन विद्या सारवे आणि आभार सहसंयोजक रेखा घावडे यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...