नवी दिल्ली: भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) विमाधारकांना मोठी आनंदाची बातमी दिली आहे. दोन वर्षांपासून बंद असलेल्या विमा योजना पुन्हा पुनर्जिवीत (रिवाव्ह्यू) करण्याची परवानगी ग्राहकांना देण्यात आली आहे. 'दोन वर्षांपासून ज्या विमा योजना बंद होत्या, त्या सुरू करण्यास परवानगी नव्हती. मात्र, आता त्या यापुढे सुरू करण्यात येणार आहेत,' असे एलआयसीने म्हटले आहे. दरम्यान, हा बदल १ डिसेंबरपासून सॉफ्टवेअर अपडेशन नंतर अमलात येणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे यापुढे पॉलिशीधारकांना २ वर्षे पूर्ण झालेल्या पॉलीसींचे सरेंडर सुद्धा करता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
निश्चित कालावधीत नियमित पॉलिसीचा हप्ता जमा न केल्यामुळे अनेक विमा योजना बंद केल्या जातात. या बंद विमा योजनांबाबत एलआयसीने एक परिपत्रक काढले आहे. '१ जानेवारी २०१४नंतर विमा योजना खरेदी करणारे ग्राहक आता प्रिमिअम जमा न केल्याच्या तारखेपासून पाच वर्षांच्या कालावधीत आणि युनिट लिंक्ड पॉलिसीधारक आपली बंद पडलेली विमा योजना अखेरच्या प्रिमअम अदा केल्याच्या तीन वर्षांच्या कालावधीत पुन्हा सुरू करू शकतात,' असे एलआयसीने म्हटले आहे.
इरडाचा नियम असा आहे.
निश्चित कालावधीत नियमित पॉलिसीचा हप्ता जमा न केल्यामुळे अनेक विमा योजना बंद केल्या जातात. या बंद विमा योजनांबाबत एलआयसीने एक परिपत्रक काढले आहे. '१ जानेवारी २०१४नंतर विमा योजना खरेदी करणारे ग्राहक आता प्रिमिअम जमा न केल्याच्या तारखेपासून पाच वर्षांच्या कालावधीत आणि युनिट लिंक्ड पॉलिसीधारक आपली बंद पडलेली विमा योजना अखेरच्या प्रिमअम अदा केल्याच्या तीन वर्षांच्या कालावधीत पुन्हा सुरू करू शकतात,' असे एलआयसीने म्हटले आहे.
इरडाचा नियम असा आहे.
विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (इरडा) २०१३ च्या नियमानुसार, विमा कालावधीत ज्या तारखेपासून प्रिमिअम अदा केले नाही, तेव्हापासून दोन वर्षांच्या कालावधीत कोणतीही विमा योजना पुन्हा कार्यान्वित केली जाऊ शकते. 'इरडा'चा हा नियम १ जानेवारी २०१४ पासून लागू झाला आहे. या तारखेनंतर खरेदी केलेल्या विमा योजनेचे दोन वर्षांहून अधिकच्या कालावधीत प्रमिअम अदा केले नाही तर ती योजना पुन्हा सुरू करता येऊ शकत नव्हती.
एलआयसीची विनंती इरडाने केली मान्य
ग्राहकांसाठीची जीवन विमा सुविधा सुरू ठेवण्यासाठी 'इरडा'शी संपर्क साधला. ज्या ग्राहकांनी १ जानेवारी २०१४नंतर विमा योजना खरेदी केली आहे, त्यांनाही बंद झालेली विमा योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी या वाढीव कालावधीचा लाभ द्यायला हवा, अशी विनंती 'इरडा'कडे केली असल्याचे एलआयसीने सांगितले. 'दुर्दैवाने अनेकदा अशी परिस्थिती उद्भवते की, एखाद्या व्यक्तीला प्रिमिअम नियमित जमा करता येत नाही. त्यामुळे त्याने खरेदी केलेली विमा योजना बंद पडते. त्यामुळं बंद पडलेली विमा योजना पुन्हा सुरू करण्याचा पर्याय हा नवीन विमा योजना खरेदी करण्यापेक्षा कधीही चांगला ठरतो,' असे एलआयसीचे महासंचालक विपिन आनंद यांनी सांगितले. आम्ही प्रत्येक विमाधारक आणि विमा योजना पुढेही चालू ठेवणाऱ्या ग्राहकांच्या अपेक्षांचा आदर करतो, असेही ते म्हणाले.याशिवाय पॉलिसीचे समर्पण (सरेंडर) संबंधी असलेल्या नियमात सुद्धा बदल करण्याचे संकेत आहेत. यापूर्वी तीन वर्ष पूर्ण झालेल्या पॉलिसींचे समर्पण करता येत होते. मात्र, यापुढे १ डिसेंबर २०१९ नंतर नियमात बदल करून आता २ वर्षानंतर पॉलिसीधारकाला आपल्या विमा योजनांचे समर्पण करता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment