Saturday 2 November 2019

आधारभूत किंमत धान खरेदी योजना जिल्ह्यातील 62 धान खरेदी केंद्राला मान्यता

गोंदिया दि. 1 : आधारभूत किंमत धान खरेदी योजना हंगाम 2019-20 करिता जिल्ह्यातील टेमनी,गोंदिया, खातिया (परतवाडा),मुंडीपार ( एम.आय.डी.सी.) गिरोला, कटंगीकला, रतनारा, दासगाव,काटी,अदासी, कामठा,नवेगाव / धापेवाडा रावणवाडी,मजितपुर,कोचेवाही,आसोली ,गोरेगाव,कालीमाटी (गोरेगाव) तिमेझरी, गणखैरा,कुऱ्हाडी ,चोपा, तेढा,दवडीपार, कवलेवाडा, मोहगाव तिल्ली ,चिरेखनी, पांजरा, वडेगाव, नवेझरी, विहीरगाव, बघोली, भिवापूर, ठाणेगाव, तिरोडा, मुंडिकोटा, चिखली, मेंढा, परसवाडा, खैरबोडी, चुरडी, आमगाव, गोरठा, कालीमाटी (आमगाव),कोटजांभोरा ,सालेकसा, पांढरी, सौंदड, मुरपार, ब्राह्मणी, हेटी ,धानोरी, अर्जुनी/ मोरगाव (वि.का.) अर्जुनी / मोरगाव (रा.मी.) अर्जुनी/ मोरगाव (ख.वि.) नवेगावबांध,महागाव, बोंडगावदेवी,वडेगाव स्टेशन, बाक्टी, धाबेटेकडी व भिवखिडकी या 62 धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मंजुरी दिली आहे.
जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांनी पाच दिवसाच्या आत धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. शेतकऱ्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना सुद्धा देण्यात आल्या आहे. धान खरेदी केंद्रावर धान्य खरेदी करतांना सदर केंद्रास जोडलेल्या गावाच्या यादीनुसार धानाची खरेदी करावी. धान खरेदी करतेवेळी शेतकऱ्यांनी त्या हंगामाचा पिक पेरा असलेला सातबाराचा उतारा मुळप्रत (त्यावर धरणाखाली लागवड क्षेत्र नमूद आहे असा), आधारकार्ड व बँक खाते पासबुक झेरॉक्स घेऊन धान खरेदी केंद्रावर आणावे. शेतकऱ्यांनी आपले बँक खाते नोंदविताना आधार लिंक असलेले केवायसी पूर्ण झाले असलेले खात्यामध्ये देवाण-घेवाण सुरू असलेले बँकेचे खाते नंबर द्यावे. शेतकऱ्यांनी धानाचे वजन काटे करतेवेळेस स्वतः ओळखपत्र घेऊन हजर राहावे धान मोजल्यावर वजन पोहोच पावती प्राप्त करून घ्यावी. एफ ए क्यू दर्जाचे धान खरेदी केल्या जाईल त्यामुळे शेतकऱ्यांनी धान चाळणी करून, साफसफाई करून तसेच वाढलेले धान खरेदी केंद्रात विक्रीस आणवे. शेतकऱ्यांनी धान चांगले भरलेले विक्रीस योग्य सुकलेले / कोरडे (आद्रता विरहित) स्वच्छ व अन्न म्हणून  खाण्यास उपयुक्त असेल समान सारख्या रंगाचे व समान आकाराचे असे धान खरेदी केले जाईल. तसेच खरेदी केलेले हे बुरशी, कीड व अनिष्ट स्वरूपांच्या गंध विरहित असावे. केंद्रावर येणार धान अपाय आणि हानीकारक वस्तूंचे, पदार्थाचे मिश्रण असणार नाही याची दक्षता घ्यावी. केंद्राला जोडलेल्या गाव आपल्या तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोकण घेतेवेळी बघण्यास उपलब्ध होईल शेतकऱ्यांनी आपला धान नंबर प्रमाणे विक्रीस आणावा त्याकरिता प्रथम केंद्रावर आपले नाव/ मोबाईल नंबर/अंदाजे वजन याची नोंद करावी. शेतकऱ्यांचे सीमांत,लघु-मध्यम,मोठे शेतकरी अशी जमीन धारणेवर आधारित तसेच अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती इतर सर्व अवर्गिकृत अशी वर्गवारी करण्याकरिता शेतकऱ्यांकडून त्यांच्या जमिनीचा नमुना 8 अ तसेच जातीबाबत चे स्वघोषित प्रमाणपत्र घेण्यात यावे. हंगाम 2019-20 करीता शासनाने आधारभूत दर अप्रत धानासाठी  प्रतिक्विंटल 1835 रुपये व साधारण प्रत धानासाठी प्रतिक्विंटल 1815 रुपये हे दर निश्चित केले आहे. धान खरेदीचा कालावधी 1 ऑक्टोबर 2019 ते 31 मार्च 2020 पर्यंत आहे. तरी सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी श्री. खर्चे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...