Wednesday 19 October 2016

मंगेवाडा जंगलातून नक्षल साहित्य जप्त

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील मंगेवाडा जंगल परिसरात नक्षल व पोलीस यांच्यामध्ये सोमवारी सायंकाळी ४.३0 वाजताच्या सुमारास चकमक उडाली. या चकमकीदरम्यान नक्षल्यांनी पळ काढल्याने घटनास्थळावरून पोलिसांनी नक्षल साहित्य जप्त केले.
उपपोलीस स्टेशन पेंढरी अंतर्गत येणार्‍या मंगेवाडा जंगल परिसरात नक्षली गोळा झाले असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस पथक व पेंढरी क्युआरटी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगेवाडा जंगल परिसरात नक्षल शोधमोहिम राबविण्यात आली. दरम्यान सोमवारी सायंकाळी ४.३0 वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांनीही नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला आहे. चकमकीनंतर पोलिसांनी शोध घेतला असता, घटनास्थळावरून ७ नग नक्षल पिटू, स्फोट घडवून आणण्याकरिता वापरण्यात येणार्‍या बॅटर्‍या, दोन सोलर प्लेट, नक्षल पुस्तके, लिखित साहित्य व मेडिकल कीट जप्त केले. उपपोलीस स्टेशन पेंढरी येथे गुन्हा दाखल केला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...