Thursday, 6 October 2016

आमगाव-देवरी मार्ग मृत्यूला आमंत्रण

आमगाव : सार्वजनिक बांधकाम विभाग रोहयो आमगाव येथील कार्यालयात अधिकारी नाहीत काय? याचे उदाहरण म्हणजे सततच्या पावसाने आमगाव-देवरी मार्गावर पडलेले खड्डे मृत्यूला आमंत्रण देत आहेत. मात्र अधिकारी किंवा कर्मचारी याची झोप अद्याप उघडली नसून ते निद्रीस्त असल्याचे समजते. अनेक दिवसांपासून आमगाव-देवरी मार्गावर ठिकठिकाणी जवळपास एक ते दोन फुटाच्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्याच खड्डय़ांतून चारचाकी, दुचाकी, सायकलस्वार प्रवास करीत आहेत. अनेक दुचाकीस्वार या खड्डय़ांत पडले. काहींना दुखापतही झाली. मात्र अधिकारी किंवा कर्मचारी समोर येऊन खड्डय़ात काही तरी गिट्टी टाकून त्यांना बुजविण्याचे धाडस अजूनपर्यंत कोणी केले नाही.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...