गोंदिया,दि.२3- : वर्षभरातील सर्वात मोठा सण असणाऱ्या दिवाळीत घरात ‘लक्ष्मी’ यावी यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. त्याचा फायदा घेत काही व्यापाऱ्यांकडून कमी भावात धान खरेदी सुरू झाली आहे. व्यापाऱ्यांकडून लुबाडणूक होऊ नये म्हणून लवकरात लवकर धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरत असताना जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून (दि.२४) धान खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्ह्यात एकूण ७९ केंद्रांवर यावर्षी शासनाच्या आधारभूत किमतीनुसार धान खरेदी होणार आहे. त्यापैकी ५६ केंद्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे तर २३ केंद्र आदिवासी विकास महामंडळाचे आहेत. सर्वच्या सर्व केंद्र सोमवारी सुरू करणे शक्य नाहीत. त्यासाठी संबंधित सहकारी संस्थांसोबत करारनामे करण्याची प्रक्रिया सुरू असून तीन दिवसात सर्व केंद्र सुरळीतपणे कार्यान्वित होतील, असा विश्वास दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.देवरीच्या महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाकडून देवरी तालुक्यात ८ आणि सालेकसा तालुक्यात ५ असे एकूण १३ आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहेत. याशिवाय सडक अर्जुनी व अर्जुनी तालुक्यातील १० केंद्र राहणार आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment