Saturday 15 October 2016

वाघाच्या कातळयांसह तीन आरोपी जेरबंद ,तीन फरार

गोंदिया,दि.15 -स्थानीक गुन्हे शाखा व वनविभागाच्या संयुक्त कारवाईत आज शनिवारला दक्षिण देवरी वनपरिक्षेत्रातंर्गत येणा-या सालई येथे वाघाचे कातळे घेवून जाणा-या टोळीला अटक करण्यात आली.यात टोळीतील 6 पैकी 3 आरोपींना घटनास्थळी पकडण्यात आले तर 3 आरोपी फरार होण्यात यशस्वी ठरले. अटक करण्यात आलेल्या आरोपी मध्ये  देवरी तालुक्यातील राजकुमार मेश्राम रा. परसवाडा , भावेश कळमकर चारभाटा, व सुरेंद्र शहारे रा. कन्हळगाव ता देवरी यांचा समावेश आहे.तर हेमंत अरकरा, सुरेश राउत व राम यादव हे आरोपी पसार झाले आहेत.पकडण्यात आलेले वाघाचे कातडे अंदाजे दीड ते दोन वर्ष वयोगटातील वाघाचे असून गडचिरोली जिल्ह्यातून हे कातडे आणण्यात आल्याची माहिती आहे.यातील फरार असलेला एक आरोपी गडचिरोली जिल्ह्यातील आहे.
पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून सदर कारवाई करण्यात आली. यात वाघाच्या मास निघालेल्या संपूर्ण तोंडाच्या जबळयापासून तर शेपटी पर्यंतचा चा एका वाघाचा कातळी सोबत  आरोपींना पकडण्यात आले. आरोपींना भारतीय दंड संहिता 1860चे 120 -3 व वन्यजीव कायद्या 1972 चे कलम 39,44,49,51,51-2-3,52  अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर वाघाचे कातळे हे कुठल्या वाघाचे आहेत याचा तपास वनविभाग आता करणार आहे. गोंदिया भंडारा जिल्हयातील शिकार झालेल्या कठल्या वाघाचे तर नाही ना ? अशी संशय वर्तविला जात आहे.  सदरची कारवाई गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ व पोलिस उपअधिक्षक डाॅ.संदीप पखाले व गोंदिया वनविभागाचे सहायक वनसंरक्षक यु.टी.बिसेन यांच्या मार्गदर्शनात  स्थानिक गुन्हे शाखेचे जयराज रनवरे वनविभागाचे श्री भोगे यांच्या पथकांनी ही कारवाई केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...