Tuesday 18 October 2016

23 आक्टोंबरला ओबीसी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर नागपूरात

नागपूर,दि.18- राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने येत्या 23 आक्टोंबर रविवारला सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत ओबीसी महासंघासह इतर सर्व ओबीसी संघटनाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यासांठी एकदिवसीय प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिर शिवाजी विज्ञान महाविद्यालय काँगेसनगर,नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात इंजि.अरविंद माळी हे ओबीसी समाजाचे हक्क अाणि सवैंधानिक अधिकार याविषयी सविस्तर माहिती देणार आहेत.सोबतच राज्यघटनेमध्ये ओबीसींसाठी असलेले अधिकार व मंडल आयोगापासून इतर ओबीसी हिताचे आयोग व निर्णय कसे रोखले गेले यावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.तरी विदर्भातील सर्व ओबीसी संघटनाच्या प्रमुखांसह पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी,महिला,शिक्षक ,विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे.तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडे आपल्या नावाची नोंदणी करुन घेण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सयोंजक प्राचार्य डाॅ.बनबराव तायवाडे,डाॅ.खुशालचंद्र बोपचे,सचिन राजुरकर,प्रा.शेषराव येलेकर,मनोज चव्हाण,शरद वानखेडे,खेमेंद्र कटरे,विनोद उलीपवार,जिवन लंजे,गुनेश्वर आरीकर,विजय तपा़डकर,प्रा.रमेश पिसे,प्रा.सुषमा भड,भुषण दडवे,निकेश पिणे आदिंनी केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...