Friday 21 October 2016

शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करावे- आ.पुराम

देवरी-  आमगाव विधानसभा क्षेत्रातील सालेकसा आणि देवरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या धानाला योग्य हमीभाव मिळावा म्हणून शासनाने त्वरीत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी विधानसभा सदस्य संजय पुराम यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली. दरम्यान, आ. पुराम यांनी आधिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांचेशी सुद्धा चर्चा केली.
आ.पुराम यांनी संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी निवेदन दिले. त्यांनी दिलेल्या निवेदनात हलक्या धानाची कापणी मोठय़ा प्रमाणावर सुरू असून अनेक शेतकरी आपल्या आवश्यक गरजा भागविण्यासाठी धान विक्री करीत आहेत. मात्र, शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने व्यापारी शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणावर लूट करीत आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीच्या समयी शेतकरी संकटात सापडला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...