Thursday 20 October 2016

तुमसरे मिल्क प्रॉडक्ट कंपनीच्या दुध डेअरीचे सांडपाणी बावनथडीत

भंडारा,दि.20 : काटेबाम्हणी येथील तुमसरे मिल्क प्रॉडक्ट कंपनीच्या दुध डेअरीचे सांडपाणी बावनथडी नदीच्या कालव्यात सोडण्यात येते. त्यामुळे हे पाणी रसायनमिश्रीत बनले आहे. हे पाणी पिकांना व जनावरांनाही जीवघेणे ठरत आहे, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. विजेची कुणीही चोरी केली तरी गुन्हा दाखल करून अटक करण्यात येते. मात्र मागील अनेक वर्षांपासून तुमसरे मिल्क प्रॉडक्टकडून वीज चोरी सुरू असतानाही कारवाई होत नसल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी पत्रपरिषदेत केला.
यावेळी शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, उपजिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, अनिल गायधने, मुकेश थोटे उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...