Monday 17 October 2016

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा आक्रोश ; भरती बंद केल्याच्या विरोधात मोर्चा

पुणे, दि. १७ : राज्य शासनाने विविध विभागातील 90 हजार जागा कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहिरातीच काढल्या गेल्या नाहीत.परिणामी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे एमपीएससी स्टुडेंटस् राईटच्या माध्यमातून 400 हून अधिक अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी सोमवारी शनिवारवाडा ते विधानभवन दरम्यान मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला.
राज्य शासनाने नोकर भरती वरील कपात त्वरीत उठवावी, राज्यसेवा,विक्रीकर निरीक्षक, वनसेवा यांच्या रिक्त जागा त्वरीत भरण्यात याव्यात.
शासनाच्या कंत्राटी पध्दतीने भरल्या जाणार व सध्या भरण्यात आलेल्या सर्व जागा स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून भराव्यात. पीएसआय पदाची 2 वर्षे न काढलेली जाहिरात त्वरीत काढावी.1998 पासून बंद झालेली एक्साईस इन्सपेक्टर पदाची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी. कृषी सेवकाच्या परीक्षेमध्ये झालेल्या भष्टाचाराची चौकशी करून त्यावर कार्यवाही करावी,आदी प्रमुख मागण्यांसाठी हजारो विद्यार्थ्यांनी मोर्चात सहभागी होऊन आपला आक्रोश व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...