Wednesday 19 October 2016

मिहान होणार औषध कंपन्यांचे हब

नागपूर : मिहान-सेझमध्ये पतंजलीसह सहा औषध उत्पादक कंपन्यांनी जागा विकत घेतली आहे. वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सेझमध्ये इंडो-यूएस कंपनीला ६ ऑक्टोबरला १५0 एकर जागा मंजूर झाल्यामुळे मिहान आता औषध उत्पादक कंपन्यांचा हब होण्याकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होणार आहे.
ल्युपिन कंपनी २५ एकर जागेत टप्प्याटप्याने १00 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीचे 'ट्रायल रन' संपले असून निर्यातीत औषधांचे उत्पादन करण्यात येत आहे. सध्या ३00 जणांना रोजगार मिळाला आहे. विस्तारीकरणात आणखी ३00 जणांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय ग्लेनमार्क कंपनीने ४0 एकर जागा मागितली आहे. त्यावर लवकरच निर्णय होणार आहे.
स्थानिक झीम लेबॉरेटरीजने ३ एकर जागा खरेदी केली असून १५ कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. मुंबई येथील थेरो लॅबने ३ एकर तर मार्कसन फार्माने एसईझेडमध्ये १0 एकर जागा पूर्वीच खरेदी केली आहे. मार्कसन १00 कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती आहे. याशिवाय स्थानिक कंपनी नितीका फार्मास्युटिकल्स ५ एकर जागेत प्रकल्प उभारणार आहे. पतंजली कंपनीने निर्यातीत क्षेत्रात प्रकल्प उभारण्याची तयारी चालविली आहे. ६0 एकर जागा खरेदी केली आहे. जमिनीची एकूण किंमत ४२ कोटी आहे. फूड झोनमध्ये पतंजलीच्या उद््घाटनप्रसंगी आचार्य बालकृष्ण यांनी १0 कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. कंपन्यांमध्ये उत्पादन सुरू झाल्यानंतर हजारो स्थानिक युवक-युवतींना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...