Friday, 21 October 2016

देवरीत किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन शिबिर

देवरी- स्थानिक व्ही कौशल्यायन महिला महाविद्यालयात लायनेस क्लब द्वारा नुकत्याच आयोजित कार्यक्रमात किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायनेस क्लबच्या अध्यक्ष वनिता दहिकर या होत्या.प्रमुख अतिथी म्हणून प्रा. सुनंदा भुरे, डॉ. सुजाता ताराम, महाविद्यालयाच्या उपप्रायार्य उंदीरवाडे, आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना प्रा. भुरे म्हणाल्या, की पुरुष प्रधान संस्कृती महिलांकडे कुठल्या नजरेने बघते, समाजात मुलींना कसे वागावे, आलेल्या संकटांचा सामना करून पुढे कसे जायचे, शिक्षणातील प्रगती, सोशियल मिडीयाचे फायदे-तोटे आदी विषयांवर मुलींचे सविस्तर मार्गदर्शन केले.डॉ ताराम यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्य विषयक समस्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
संचलन शीतल सोनवाने यांनी केले.उपस्थितांचे आभार अल्का दुबे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आरती चौरागडे, अर्चना नरवरे,वैशाली संगिडवार, शिव्पा मारगये, सरोज शेंद्रे, शुभांगी निनावे, पिंकी कटकवार, पुष्पा नळपते, लक्ष्मी पंचमवार, कमलेश्वरी गौतम, सुलभा भुते, करूणा कुर्वे आदींनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...