Wednesday 19 October 2016

लाखांदुरात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर मोर्चा

लाखांदूर दि.19: पीक विम्याचा लाभ मिळाला पाहिजे, वीज बिल माफ करण्यात यावे, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला पाहिजे, विद्यार्थ्याच्या शुल्कामध्ये सवलत मिळाली पाहिजे, विदर्भ राज्य वेगळे झाले पाहिजे, ऊस उत्पादक शेतकर्‍यांना १00 टक्के अनुदानावर तारेचे कुंपण मिळाले पाहिजे, आधारभूत धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा, अशा विविध मागण्यांसाठी लाखांदूर तालुका काँग्रेसच्यावतीने मंगळवारला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
येथील गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून लाखांदूर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शेतकर्‍यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. तहसील कार्यालय परिसरात सभा घेण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या प्रदेश सचिव प्रमिला कुटे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, भंडार्‍याचे माजी नगराध्यक्ष बशिर पटेल, नगरसेवक रामचंद्र राऊत, शफी लद्धानी, भुमेश्‍वर महावाडे, मनोहर राऊत, डॉ.अजय तुमसर, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप बुराडे, मंगला बागमारे, प्रणाली ठाकरे, शुध्दमता नंदागवळी, नीलिमा टेंभुर्णे, ताराचंद मातेरे, धम्मदीप रंगारी, गोपाळ मेंढे, धनु कार, भोजराव राऊत, गजानन नाकतोडे उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...